याला श्राप देऊ नका, कारण मला ठाम विश्वास आहे की तो अल्लाह व त्याच्या प्रेषितांशी सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रेम करतो
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम काळात एका व्यक्तीचे नाव अब्दुल्ला होते, तसेच त्याचे टोपण नाव हमार (गाढव) होते, तो प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नेहमी हासवत होता, दारुची नशा केल्यामुळे प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम त्याला (चाबका) कोड्याची शिक्षा सुद्धा दिली होती, एका दिवसी पुन्हा त्याला पकडुन आणण्यात आले, कारण तो नशाधिन होता, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम पुन्हा त्याला कोडे मारण्याचा आदेश दिला, त्यामुळे त्याला कोड्याची सजा देण्यात आली,
जमावापैकी एकाने म्हटले: हे अल्लाह, याला श्रापीत कर, याला वारंवार व्यसनाधीनते मुळे आणण्यात येते?
त्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उदगारले:<<याला श्राप देऊ नका, कारण मला ठाम विश्वास आहे की तो अल्लाह व त्याच्या प्रेषितांशी सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रेम करतो>>.
Explanation
यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले: त्याच्यावर अल्लाहच्या दयेपासून दूर होण्याची बद्दुआ करू नका, कारण मला त्याच्याबद्दल इतकेच माहीत आहे की तो अल्लाह आणि त्याच्या रसूलवर प्रेम करतो.
Benefits
ज्या व्यक्ती कडुन मोठे गुन्हाचे क्रॄत्य घडले आणी जर त्याचा म्रॄत्यु झाला तर त्याचा मामला अल्लाह च्या सुपुर्द आहे, अल्लाह ची मर्जी असली तर तो त्याला क्षमा करेल, अन्यथा सजा देईल, परंतु इस्लाम ला स्वीकारणारा नेहमी करता नरकात राहणार नाही.
कोणत्याही दारुड्याला व्यसनाधारीला श्राप देणे अमान्य आहे, कारण असे होऊ शकते की एखाद्या रुकावटीमुळे त्याला श्राप पोहचत नसेल; एखाद्या व्यक्तीवर श्राप व त्याला बरेवाईट नावाने पुकारणे त्या व्यक्तीला अजुन वाईट क्रॄत्यांकडे ढकलु शकते, आणी अल्लाह कडे क्षमा मागण्यापासुन त्याला पराव्रॄत्त करु शकते.
ज्या व्यक्तीचे नाव निश्चित केलेले नाही पण जी त्या वाईट गुणाने (त्या दोषाने) ओळखली जाते, अशा अनिर्दिष्ट व्यक्तीवर लानत (शाप) करणे मान्य आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

