अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की श्याम मध्ये काही अजमी शेतकऱ्यां जवळुन गेलो असता, त्यांना उन्हात उभे करण्यात आले होते, त्यांनी विचारले:या लोकांना काय झाले?
लोकांनी सांगितले की: यांनी जिझीया न भरल्यामुळे हि सजा देण्यात आली आहे,
हिश्शाम अल्लाह राजी असो त्यांच्यावर नि फरमाविले की:मी ग्वाही देतो की मी स्वतः प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट सांगताना ऐकले: <<अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात>>.
Explanation
Benefits
लोकांना नाहक त्रास देणे, मग ते कोणत्याही धर्माचे असो विना कारण परेशान करणे हराम आहे.
जुलमी लोकांना संदेश आहे की, अत्याचाराचा परिणाम फार वाईट आहे.
साहाबा रजिअल्लाहु अनहु भलाई चे संदेष्ट्ये व बुराई च्या विरोधात अत्यंत कठोर भुमिका घेत होते.
ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:ही कठोरता व निषेध ज्या मध्ये विनाकारण त्रास दिला असेल, मात्र जिथे शरीयत चा स्पष्ट आदेश असेल जसे किसास,हुदुद,वगैरे तशा बाबी यात समाविष्ट नाही.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

