जो व्यक्ती लोकांचे आभार मानत नाही, तो व्यक्ती सर्वोच्च अल्लाह चा क्रॄतज्ञ होत नाही
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु कथन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की: <<जो व्यक्ती लोकांचे आभार मानत नाही, तो व्यक्ती सर्वोच्च अल्लाह चा क्रॄतज्ञ होत नाही>>
Explanation
कारण दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत, जो लोकांच्या उपकार व देणग्यांचा ईंकार करतो, त्यांचे उपकार मानत नाही, त्याच्या नसानसात क्रॄतघ्नता भिनते, आणी हिच वाईट सवय त्याला अल्लाह ची सुद्धा क्रॄतघ्न (नकारी) बनविते, क्रॄतज्ञतेच्या चांगल्या सवयी पासुन दुर ठेवते.
Benefits
खरा कृपादाता अल्लाह तआला आहे, आणि उत्तम स्वभाव हे फक्त ते साधन आहेत ज्यांना अल्लाह तआला ज्याच्यासाठी इच्छितो त्याच्यासाठी कार्यरत करतो, म्हणूनच लोकांचे आभार मानणे हे प्रत्यक्षात अल्लाह तआलाचे आभार मानणे होय.
लोकांचे आभार मानणे, हे उच्चतम चारित्र्य व सभ्य व्यक्तिमत्त्वाचे द्योतक आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

