काय मी तुम्हाला सांगु नये, तुमच्यापैकी सज्जन कोण व दुर्जन कोण आहे?
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अबु बरीराह रजिअल्लाहु अनहु कथन करतात की प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम एकदिवस लोकं जमलेल्या ठिकाणी आले व त्यांनी फरमावीले: <<काय मी तुम्हाला सांगु नये, तुमच्यापैकी सज्जन कोण व दुर्जन कोण आहे?>>
कथन करणारे सांगतात की: सगळे जण चुपचाप बसले, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम तिन वेळा हाच सवाल उपस्थितांना केला, मग एक व्यक्ती म्हणाला:हे प्रेषिता! आम्हाला अवश्य सांगा, आमच्या पैकी सज्जन कोण व दुर्जन कोण,
त्यावर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले:<<तुमच्यापैकी सज्जन तो आहे, ज्याच्या कडुन लोकांना भलाई ची उम्मेद असेल आणी ज्याच्या बुराई पासुन लोकं सुरक्षित असतील, आणी तुमच्यापैकी दुर्जन तो आहे, ज्याच्या कडुन भलाई ची अपेक्षा नसावी, आणी ज्याच्या बुराई पासुन लोकं सुरक्षित नसतील>>.
Explanation
या प्रश्नाच्या उत्तरात सहाबा चिडीचुप व भयभीत झाले, कदाचित सज्जन व दुर्जना बाबत माहिती झाल्यावर, एखाद्याच्या मानहानी च्या भितीपोटी ते सर्व चुपचाप बसले. प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम तिन वेळा सवाल केला, तेव्हा एका सहाबींनी नम्रतेने विचारले की, हो आम्हाला अवश्य सांगावे. तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम स्पष्ट केले:सज्जन तो व्यक्ती आहे, ज्याच्या कडुन लोकांना फक्त भलाई, चांगुलपणा व उपकारकता व सदाचाराची अपेक्षा असेल, आणी लोकं त्याच्या जुलुम व अत्याचारापासून व नुकसाना होण्या पासुन सुरक्षित राहतील,
दुर्जन तो व्यक्ती आहे, ज्याच्या कडुन कोणत्याही भलाई ची अपेक्षा नसेल आणी लोकं त्याच्या जुलुम, अत्याचारा पासुन भयभित असतील.
Benefits
ईतरांना फायदा किंवा नुकसान पोहचवणे, हे वैयक्तिक उपासने पेक्षा अधिकतम श्रेष्ठ आहे.
सत्कर्म व चारित्र्य व सदाचारी तसेच लोकांसोबत सदव्यवहार करण्यावर भर देण्यात आला आहे. जुलुम अत्याचार व दुर्व्यवहारापासुन सक्तीने रोकण्यात आले आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

