HadeethEnc · 1.24.0
मी कयामतच्या दिवसी तिन प्रकारच्या लोकांच्या विरोधात उभा राहिल
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की: <<मी कयामतच्या दिवसी तिन प्रकारच्या लोकांच्या विरोधात उभा राहिल:
पहिला तो व्यक्ती जो माझे नाव घेऊन करार करतो,आणी त्यावर ठाम राहता नाही,व करार मोडतो, दुसरा तो व्यक्ती जो कुण्या आजाद मनुष्याला विकुन त्याची किंमत हडपतो, तिसरा तो व्यक्ती जो एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवतो, त्याच्या कडून कामे पुर्ण करुन घेतो, मात्र त्याची मजदुरी अदा करत नाही>>.
02
Explanation
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम माहिती दिली आहे की, साक्षात अल्लाह फरमावितो की, तिन प्रकारच्या लोकांविरोधात कयामतच्या दिवसी मी स्वतः प्रतिद्वंदी म्हणुन दावा करेन, आणी ज्याच्या विरोधात मी उभा राहिलो तर त्याला कडी सजा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: पहिला तो व्यक्ती जो अल्लाह चे नाव घेऊन शपथ घेतो व करार करतो मात्र त्यावर ठाम राहत नाही, तर सरळ सरळ विश्वासघातच करतो. दुसरा तो व्यक्ती जो एखाद्या आजाद माणसाला गुलाम बनवुन विकतो आणी त्याची किंमत सुद्धा हडप करतो. तिसरा तो व्यक्ती जो एखाद्या मजुराला कामावर ठेवतो, काम करून घेतो, परंतु त्याच्या मजदुरीची परतफेड करत नाही.
03
Benefits
सदर हदिस त्या हदिस पैकी आहे, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम साक्षात अल्लाह कडुन वर्णन केले आहे, अशा हदिस ला हदिस ए कुदसी व हदिस ए ईलाही म्हणतात, हदिस ए कुदसी मध्ये असणारे शब्द व अर्थ सुद्धा अल्लाह कडुन असतो, परंतु फरक एवढाच असतो की फक्त या हदिस ला कुरआन एवढे महत्त्व नसते, जसे कुरआन ची (तिलावत) पठण करणे सुद्धा भक्तीच आहे, तसेच कुरान वाचना करता तहारत म्हणजे शुद्धता असणे आवश्यक आहे, कुरआन चे अनन्यसाधारण महत्त्व व त्याचे संपुर्ण मानवतेला आवाहन करणे.
ईमाम सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:या तिन प्रकारच्या लोकांचा उल्लेख फक्त नमुना (उदाहरण)म्हणून केला गेला आहे, अन्यथा सर्वोच्च अल्लाह सर्व प्रकारच्या जुलुम व अन्यायाविरुद्ध आहे, या तिन प्रकारच्या लोकांचा उल्लेख विशेष या करता करण्यात आला आहे.
ईब्ने जौझी रहमतुल्लाह सांगतात की: आजाद मनुष्य फक्त एकमेव अल्लाह चा गुलाम आहे, आणी जो कुणी त्याच्यावर जुलुम जबरदस्ती करतो त्याच्या विरुद्ध खुद्द एकमेव अल्लाह उभा असेल.
खत्ताबी रहमहुल्लाह सांगतात की: आजाद मनुष्याला गुलाम* बनविण्याचे दोन प्रकार आहेत: एखाद्या व्यक्तीला आजाद केल्यावर त्याची आजादी लपविणे किंवा त्यास नकार देणे. एखाद्या आजाद मनुष्या कडुन गुलामा सारखा व्यवहार करणे, परंतु पहिला प्रकार जास्त गंभीर स्वरूपाचा आहे. अजुन सदर हदिस मध्ये सक्त ताकीद दिली गेली आहे; कारण यामध्ये आजादी लपविणे व त्याचा ईंकार करणे तसेच त्याला विकणे व रक्कम हडपणे सारखा गुन्हा चा उल्लेख आहे, म्हणून एवढा गंभीर सजा देण्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला आहे.

Attribution
[رواه البخاري]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares