हे बिलाल, मला तुमच्या ईस्लाम मधील त्या क्रॄत्यांबद्दल सांगा, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त सफलतेची आशा आहे
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम सकाळच्या नमाज (फज्र) वेळी हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु ला विचारले की: << हे बिलाल, मला तुमच्या ईस्लाम मधील त्या क्रॄत्यांबद्दल सांगा, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त सफलतेची आशा आहे, कारण मी (जन्नत) स्वर्गात तुमच्या बुटाचा आवाज माझ्या समोरा समोर ऐकला आहे>>,
हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु म्हणाले: मी ईस्लाम मध्ये असे कोणतेही आचरण केले नाही, ज्या बद्दल मला यापेक्षा जास्त सफलतेची आशा असेल, मी दिवसा रात्री तुन फक्त ज्या ज्या वेळी वुजु केला असेल, त्या त्या वेळी वुजु सोबतच मी अल्लाह करता नफिल नमाज अदा केली आहे, जेवढी माझ्या नशीबी होती.
Explanation
Benefits
प्रत्येक वुजु नंतर नमाज अदा करणे योग्य व सुंदर आचरण आहे.
गुरुंचे आपल्या शिष्याला त्याच्या आचरणा बाबत विचारणा करणे योग्य आहे, कारण जर ते आचरण योग्य असेल तर त्यावर नियमीतता वर्तवण्याचे आदेश द्यावे, आणी जर क्रॄत्य अयोग्य असेल तर त्यावर तंबी करणे गरजेचे आहे.
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी हजरत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु यांना दिलेली साक्ष की ते जन्नतवाल्यांपैकी आहेत.
हा प्रश्न फज्रच्या नमाजच्या वेळी विचारला गेला होता, यात याकडे संकेत आहे की ही घटना प्रेषित सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या स्वप्नात घडली होती, आणि प्रेषितांची स्वप्ने सत्य असतात.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

