निसंदेह मनुष्य नमाज अदा करतो, परंतु त्याच्या वाट्याला फक्त दहावा हिस्सा किंवा नउवा, किंवा आठवा, किंवा सातवा, किंवा सहावा, किंवा पाचवा, किंवा चौथा, किंवा तिसरा, किंवा अर्धा हिस्सा येतो
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अब्दुल्ला बिन अनमता रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: त्यांनी एकदा अम्मार बिन यासीर रजिअल्लाहु अनहु ला बघितले कि ते मस्जीद मध्ये आले व त्यांनी नमाज अदा केली, परंतु त्यांनी फार थोडक्यात नमाज पुर्ण केली, जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा मी त्यांना विचारले की, हे अबु अलयकतान! तुम्ही तर नमाज फार थोडक्यात ऊरकली,
त्यावर हजरत अम्मार रजिअल्लाहु अनहु म्हणाले:काय तुम्ही मला नमाज च्या मर्यादेचा (नमाज मधील मुळस्तंभ,आवश्यक व सुन्नत) भंग करतांना बघितले?!
मी म्हणालो: नाही,
त्यावर ते म्हणाले:मी नमाज थोडक्यात उरकली कारण शैतान च्या गफलतीतुन सुटका व्हावी,
मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना फरमावितांना ऐकले आहे की:<<निसंदेह मनुष्य नमाज अदा करतो, परंतु त्याच्या वाट्याला फक्त दहावा हिस्सा किंवा नउवा, किंवा आठवा, किंवा सातवा, किंवा सहावा, किंवा पाचवा, किंवा चौथा, किंवा तिसरा, किंवा अर्धा हिस्सा येतो>>.
Explanation
जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्याजवळ हजरत अब्दुल्ला बिन अनमता रजिअल्लाहु अनहु आले, विचारु लागले की:हे अबु अलयकतान!
मी तुम्हाला फार थोडक्यात नमाज उरकतांना बघितले! त्यावर हजरत अम्मार रजिअल्लाहु अनहु नि फरमाविले:काय तुम्ही बघितले की, मी नमाज मधील आंतरीक स्वरुप जसे अरकान, वाजीबात, किंवा शर्ती पैकी कोणत्याही बाबतीत कमी केली आहे का?!
त्यांनी सांगितले की, नाही,
तेव्हा हजरत अम्मार बिन यासीर रजिअल्लाहु अनहु म्हणाले:शैतानाने माझे लक्ष्य विचलित करु नये, म्हणुन मी नमाज लवकर अदा केली. मग त्यांनी प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची हदिस सांगीतली:एक व्यक्ती नमाज अदा करतो परंतु त्याच्या वाट्याला कधि दहावा भाग कधि नउवा भाग, तर कधि आठवा तर कधि सातवा किंवा कधि सहावा, तर कधि पाचवा, कधि चौथा,कधि तिसरा तर कधि कधि तर फक्त अर्धाच हिस्सा लिहील्या जातो.
Benefits
कोणत्याही बाबतीत आरोपापुर्वी छानबिन व प्रश्नोत्तरे करणे आवश्यक आहे.
प्रश्न व शंकेच्या उत्तरात प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या शिकवणी वर पुर्ण समाधानी होणे.
एकाग्रता व चित्त विचलित झाल्यामुळे नमाज च्या दर्जा मध्ये सुद्धा घट होते.
नमाज पठण करतांना एकाग़्रता व चिंतन तसेच पुर्ण ध्यान एकमेव अल्लाह कडे असणयाची ताकीद आली आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

