जो ज्ञान संपादन करतो, त्याचा स्वच्छ हेतु फक्त अल्लाह ची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असला पाहिजे, आणी जर त्याने ज्ञान भौतीक फायदा करता प्राप्त केले तर कयामतच्या अंतिम दिवसी तो [जन्नत ] स्वर्गाच्या सुगंधा पासुन तो वंचित केला जाईल
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
अबुहुरैरा अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<जो ज्ञान संपादन करतो, त्याचा स्वच्छ हेतु फक्त अल्लाह ची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असला पाहिजे, आणी जर त्याने ज्ञान भौतीक फायदा करता प्राप्त केले तर कयामतच्या अंतिम दिवसी तो [जन्नत ] स्वर्गाच्या सुगंधा पासुन तो वंचित केला जाईल>> म्हणजे त्याला स्वर्गाचा गंध पण मिळणार नाही.
Explanation
Benefits
देखावा, किंवा जगाच्या फायद्या साठी धार्मिक ज्ञान संपादन करणे एक गुन्हा व मोठे पाप आहे.
जर कुणी फक्त अल्लाह खातर ज्ञान संपादन केले परंतु काळांतराने त्याला भौतीक फायदा सुद्धा आपोआप मिळाला तर त्यात काही गैर नाही.
ईमाम सिनदी रहमाउल्लाह म्हणतात की:शब्द (अरफल जन्नत) चा अर्थ आहे, जन्नत चा सुगंध होतो, वरील हदिस मधे आहे की तो व्यक्ती स्वर्गा पासुन खुप लांब असेल, तर तो स्वर्गाला पुर्णपणे मुकेल, कारण ज्याला संबंधित वस्तुचा सुगंध पण मिळत नसेल तर तो संबंधित वस्तु पर्यंत पोहोचुच शकत नाही.
जो व्यक्ती धार्मिक ज्ञान फक्त नौकरी किंवा पदाकरता, किंवा इतर फायद्या करता प्राप्त करतो, त्याला लवकर अल्लाह जवळ क्षमा मागायला हवी, सर्वोच्च अल्लाह मोठ्या क्रुपा व दयाळु आहे, तो क्षमा मागणाऱ्या ला क्षमा करतो व त्याचा हेतू पण दुरुस्त करतो.
हा गंभीर ईशारा धार्मिक ज्ञान संपादन करणे बाबत आहे, जर कुणी इंजीनियर किंवा विज्ञान शीकत असेल व त्याचा हेतु त्याद्वारे जगाचे फायदे उचलणे असेल तर त्याचा विषय त्याच्या नियत व हेतुवर अवलंबुन असेल, अशा व्यक्तींवर सदर हदिस लागु होत नाही.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

