मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
इयास बिन अब्दुल्ला बिन अबी जुबाबा सांगतात की प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<अल्लाह च्या दासींना [महिलांना] मारु नका>>
मग उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांजवळ तक्रार करत म्हणाले की:महिला आपल्या पतिंवर वरचढ ठरत आहेत व अवज्ञा करत आहेत,
त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] त्यांना समज देण्याकरता हलका मार मारण्याची परवानगी दिली,
तद्नंतर प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] घरी अनेक महिला तक्रार करत दाखल झाल्या,
त्यावर प्रेषितांनी [ सल्लल्लाहु अलैही व सल्लम] फरमाविले की:<<मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत>>.
Explanation
Benefits
सर्वोच्च अल्लाह ने स्पष्ट केले आहे की:(ज्या महिलांबाबत तुम्हाला अवहेलना व अवज्ञा ची भीती वाटते, त्यांना समजावुन सांगा किंवा झोपणे वेगळे करावे व जरुरी वाटल्यास हल्का मार मारावा जर त्या तुमचं ऐकत असल्यास अन्याय व जुलुम चे मार्ग शोधु नका निश्चितच अल्लाह सर्वश्रेष्ठ आणि महान आहे) [निसा:३४], याचा अर्थ आहे, पहिले समजावून सांगावे, जर यश न मिळाल्यास झोपणे वेगळे करावे, अजुनही सुधारणा झाली नाही तर हलका व सौम्य मार मारावा ज्यात ईजा न व्हावी, हे तिन टप्पे मरहलेवार आहेत, एकाचवेळी यावर अमल करणे शक्य नाही.
पुरुष घराचा प्रमुख व जबाबदार आहे, त्याने आपल्या घरच्या मंडळींना संस्कारीत करावे, प्रेमाने व नरमाईने.
जर एखादा निर्णय फतवा चुकीचा सिद्ध होत असल्यास, प्रमुखांना कळवणे जरुरी आहे.
जर कुणावर जुलुम अन्याय झाल्यास त्याने प्रमुखां समोर आपली फिर्याद मांडावी.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

