खुशखबरी असो तुम्हाला दोन नुर ची जे तुम्हाला प्रदान करण्यात आले आहे तसे यापुर्वी कोणत्याच पैगंबराला देण्यात आले नव्हते: १} सुरस फातीहा. २}सुरह बकरा ची शेवटची दोन आयात, तुम्ही या दोन प्रकाशां पैकी कोणतेही [ शब्द] हुरुफ तिलावत [वाचन] केल्याने वाचणाऱ्याला खुप नेकी व पुण्य मिळेल तसेच ते सुद्धा मिळेल ज्याची तुम्ही दुआ [याचना] केली असेल
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
अब्दुल्ला बिन अब्बास अल्लाह त्याच्यावर प्रसन्न होऊ कथन करतात की : << जिब्राईल अलैसलाम प्रेषितां [सलामती असो त्यांच्यावर]सोबत बसलेले होते, त्यांना वरुन एक आवाज ऐकु आला, जसे दरवाजा उघडतांना आवाज येतो, जिब्राईल अलैसलाम नि आपल्या डोकं उंचाऊन बघितले व म्हणाले, आकाशाचा दरवाजा उघडला गेला, व हा दरवाजा या पहिले कधिच उघडला गेला नव्हता, मग या दरवाजातून एक फरिश्ता [दुत]अवतरला,
जिब्राईल अलैसलाम म्हणाले की हा एक फरिश्ता दुत आहे, जो जमीनीवर आला आहे, तो या पुर्वी कधीच पाठविण्यात आला नाही, तो फरिश्ता [दुत] प्रेषितां[ सलामती असो त्यांच्यावर] जवळ आला, सलाम करुन म्हणाला:खुशखबरी असो तुम्हाला दोन नुर ची जे तुम्हाला प्रदान करण्यात आले आहे तसे यापुर्वी कोणत्याच पैगंबराला देण्यात आले नव्हते:
१} सुरस फातीहा.
२}सुरह बकरा ची शेवटची दोन आयात,
तुम्ही या दोन प्रकाशां पैकी कोणतेही [ शब्द] हुरुफ तिलावत [वाचन] केल्याने वाचणाऱ्याला खुप नेकी व पुण्य मिळेल तसेच ते सुद्धा मिळेल ज्याची तुम्ही दुआ [याचना] केली असेल>>.
Explanation
Benefits
आकाशाचे दार फक्त आणी फक्त अल्लाह च्या आदेशानेच उघडल्या जातात, व त्याच्याच आदेशाने बंद राहतात, आणी इथुनच अल्लाह चा आदेश येतो.
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उच्च स्थान व दर्जा दिसतो, कुण्याच पैगंबराला अशी महान देणगी देण्यात आली नव्हती, सुरह फातीहा व सुरह बकरा ची शेवटची दोन आयात.
धार्मिक शीकवणी बाबतीत शुभवार्ता देणे व [उम्मीद] आशेची किरण दाखविणे एक सुंदर पद्धत आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

